सातारा जिल्हाहोम

कराडला शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे दिमाखात उदघाटन

कराड/प्रतिनिधी : –

विजय दिवस समारोहाचा आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आज दुपारी प्रारंभ करण्यात आला. शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उदघाटन कर्नल पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, विजय दिवस समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, विजय दिवस समीतीचे संचालक सलीम मुजावर, प्रा. बी. एस. खोत, रमेश पवार, मोहनराव डोळ, जयवंतराव मोहिते, श्री. मगरे, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी काटेकर आदि उपस्थित होते.

शस्त्रास्त्र पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही प्रदर्शन पाहण्यासाठी आणण्यात आले होते. प्रदर्शनात कारगील युध्द गाजवलेली सैन्यदलाची बोफोर्स तोफ ही उपस्थितांचे आकर्षण ठरली. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सैन्यदलातील अधिकारी यांनी त्या तोफेचे प्रात्यक्षिक कर्नल पाटील व त्यांच्या सहकार्यांना दाखवले. भारतीय बनावटीची २० किलो मीटरपर्यत जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी तोफही लक्षवेधी ठरले.

 

Related Articles