विजय दिवस समारोहाच्या कराड दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
भारताने बांग्लामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कऱ्हाडला कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १९९८ पासुन येथे विजय दिवस समारोह साजरा होत आहे. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या विजय दिवसांच्या कार्यक्रमांची सुरुवात कराड दौडने आज करण्यात आली. भारतीय सैन्यदलाच्या मराठा लाईट इंन्फंट्रीच्या जवानांचे बॅण्डपथकातील जवानांनी वाजवलेल्या जयोस्तुत्ये या गिताच्या वादाने दौडीला प्रारंभ करण्यात आला.
येथील दत्त चौकात माजी आमदार आनंदराव पाटील, विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, संचालक विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सलीम मुजावर, प्रा. बी. एस. खोत, सागर बर्गे, ए. आर. पवार, रत्नाकर शानभाग, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रसाद पावसकर, चंद्रशेखर नकाते, शामसुंदर मुसळे, प्रफुल्ल ठाकुर, जयकर पवार, रमेश शहा, आत्माराम अर्जुगडे, संजय डवरी, सौफुल्ला मोमीन, शंकर वेताळ, महेंद्र भोसले, मोहनराव डोळ, सुहास भुंजे आदिंच्या उपस्थितीत झाला. ही दौड दत्त चौकातुन आझाद चौक, चावडी चौक मार्गे कन्याशाळेसमोरुन कृष्णा नाका मार्गे शिवाजी उद्यान परिसरात नेण्यात आली. तेथे त्या दौडीचा समारोप झाला. या दौडीमध्ये रोटरी क्लब, हास्य क्लबचे सदस्य, टिळक हायस्कुल, यशवंत हायस्कुल, लाहोटी कन्याशाळा, संत तुकाराम हायस्कुल, पालिका शाळा क्रमांक तीन, पालिका, जेष्ठ नागरीक संघ, दक्ष नागरीक पोलिस मित्र संघटना, शिवाजी उद्यान ग्रुप, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान आदि घोषणा दिल्याने चांगलीच वातावरण निर्मीती झाली. महेंद्र भोसले यांनी सुत्रसंचालन केले. अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आभार मानले.