सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराडमध्ये परभणी घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा
101 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याला हिंसक वळण लागले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कराड शहर व तालुक्यातील आंबेडकर समाज, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
या मोर्चामध्ये आंबेडकरी विचारसरणीचे विविध नेते आणि कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भोसले, नितीन ढेकळे, दत्तात्रेय दुपटे, बहुजन समाज पार्टीचे किरण थोरवडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे, विद्याधर गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे, आर.पी.आय. (ए) चे मुकुंद माने, वंचित बहुजन आघाडीचे संतोष बोलके, मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक सलीम मुजावर, काँग्रेसच्या बी. सी. सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके, जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळोखे, दलितमित्र कादर नायकवडी, योगेश लादे, सारिका लादे, प्रशांत थोरवडे यांचा समावेश होता.
101 1 minute read