दिव्यांग विद्यार्थीसाठी केअर सेंटरची उभारणी – गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे

कराड/प्रतिनिधी : –
कराड विकास गटातील तीव्र व अति तीव्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे व कौशल्य विकास करणे साठी हा या डे-केअर सेंटरची उभारणी केली आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी केले.
बनवडी, ता. कराड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आज दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून डे केअर सेंटर कराड सुरू करण्यात आले यावेळी ते बोलत होते .यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप, रमेश कांबळे, केंद्र प्रमुख मधुसूदन सोनवणे समावेशित शिक्षण चे केशव चौगले यांची होती.
गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे म्हणाले दिव्यांग विद्यार्थी शाळेपासून दूर न जाता त्या विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी या केअर सेंटर ची उभारणी केली आहे.याला पालक, शिक्षक यांनी सहकार्य केले पाहिजे. दिव्यांग विद्यार्थी विकासासाठी शिक्षण विभाग नेहमी कट्टीबध्द आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केशव चौगले सुत्रसंचलन लतिका गावडे व आभार मधुसूदन सोनवणे यांनी मानले.