अर्णव निकममुळे वेस्टफिल्ड कॉलेजला घवघवीत यश
ट्रेडिशनल थांग आणि कराटे मध्ये सिल्वर आणि ब्राँझ पदक पदकाचा मानकरी

कराड / प्रतिनिधी : –
क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तर्फे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सातारा व कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद द्वारा आयोजित विभागास्तरीय शालेय थांग ता मार्शल आर्ट आणि कराटे क्रिडा स्पर्धा नोव्हेंबर २०२४ मध्ये सातारा व कोल्हापूर येथे पार पाडल्या.
या स्पर्धेत अनेक जिल्हयांतून खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी थांग ता मार्शल आर्ट आणि कराटे क्रिडाप्रकारात १९ वर्षेखालील वयोगटात वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज, राजमाची ता. कराड मधील इयत्ता १२वी चा विद्यार्थी अर्णव श्रीनिवास निकम हा गोल्ड आणि सिल्वर पदकाचा मानकरी ठरला. त्याच्या घवघवीत यशाबददल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची चे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी तसेच सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले व त्याच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.