आरोग्य धनसंपदाहोम
मलकापूर रोटरी क्लबतर्फे येळगाव येथे नेत्र तपासणी
३९६ विद्यार्थी व विद्यार्थिनींची तपासणी

कराड / प्रतिनिधी : –
रयत शिक्षण संस्थेचे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येळगावमधील एकूण ३९६ विद्यार्थी व विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ मलकापूर व संस्कार नेत्र रुग्णालय, कराड डॉ. फासे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी करण्यात आली.
यामध्ये २६ मुले व मुली यांना नेत्रदोष आढळून आले. सदर प्रोजेक्टसाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक व स्टाफ तसेच रो. सलीम मुजावर, रो. विलासराव पवार, अध्यक्ष रो. चंद्रशेखर दोडमणी, सचिव रो. विकास थोरात यांनी परिश्रम घेतले