आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

पाटणला २३ नोव्हेंबरला राजकीय भूकंप होणार, त्याचा केंद्रबिंदू हर्षद कदम असेल -खा.संजय राऊत

 

कराड / प्रतिनिधी : –

ज्यांना शिवसेनेने आमदार केले, मंत्री केले, महत्वाची खाती दिली. त्यांनी गद्दारी केली. पाटणला गद्दारीची किड लागली असून पाटणवासीय ती पुसून टाकतील. असा विश्वास उबाठा शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पाटण विधानसभा मतदारसंघातील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणे, मुबई येथे आयोजित केलेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, यावेळी पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर गेली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानी तरूणाला संधी दिल्याने हे घडले आहे. मात्र सत्यजित पाटणकर नेमके कशासाठी उभे राहिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाटणला १९६७ ला भूकंप झाला आता होता. आता  राजकीय भूकंप २३ नोव्हेंबरला होणार आहे. त्याचा केंद्रबिंदू हर्षद कदम असेल. शिवसेना एक कुटुंब म्हणूनच राहते. तसेच शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने भल्याभल्यांना पाडलय. पाटणमध्ये हर्षद कदम टिकेल आणि गद्दारांना पाडेल.देसाई-पाटणकर यांनी तालुक्यात काय विकास केला. जास्तीत जास्त दारूचे दुकाने निघाली. शंभूराज देसाईंकडील खाते सर्वात भ्रष्ट खाते आहे. याची लाज वाटली पाहिजे.
महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे रक्षणकर्ते असून त्या ४० मधला गद्दार पुन्हा आमदार दिसणार नाही. राज्यातील सर्व उद्योग गुजरातला चाललेत. एक दिवस ते महाराष्ट्राचे आदानीराष्ट्र करतील. पुढला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील, त्याचे हात बळकट करण्यासाठी हर्षद कदमांना विजयी करा.
हर्षद कदम म्हणाले, गद्दारी आणि बंडखोरीला लढा देण्यासाठी माझा संघर्ष सुरू असल्यामुळे दोघांचा सर्व गोतावळा जमिनीवर आला आहे. तालुक्यात तिसरा तिसरा मोठा झालेला यांना चालत नाही. त्यांच्या समोर सर्वसामान्य पण एक कडवट शिवसैनिक उभा आहे. आम्ही लढणारे आहोत, पळून जाणारे नाही. पाटण वाल्यांनी आघाडीच्या नावाखाली आमचा वापर करून घेतला. तालुक्यात खूप काही करण्यासाठी आहे, पण ती मानसिकता विरोधकांची नाही.
याप्रसंगी राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, तालुकाप्रमुख सचिन आचरे, सुरेश पाटील, सतीश काळगावकर, संजय संकपाळ, रामचंद्र पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles