आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रहोम

अतुल बाबांसाठी विनू बाबा मैदानात

ऐतिहासिक मताधिक्य देऊन अतुलबाबांना आमदार करूया : विनायक भोसले

 

 

कराड / प्रतिनिधी : –

मलकापूर शहरातील सुज्ञ मतदार नेहमीच अतुलबाबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. लोकसभा निवडणूकीमध्ये शहराने भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य दिले. आता आपल्याला ऐतिहासिक मताधिक्य देऊन अतुलबाबांना आमदार करून विधानसभेमध्ये पाठवून द्यायचे आहे. अतुलबाबांनी शहरासाठी २० कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी शहर विकासासाठी उपलब्ध केला आहे. अतुलबाबा आमदार झाल्यावर कोठ्यावधींचा विकास निधी आपल्या शहराला उपलब्ध करतील असा विश्वास कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी व्यक्त केला.

शहरातील शास्त्रीनगर विभागामध्ये विनायक भोसले यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, नगरसेवक शहाजी पाटील, उद्योजक विजय चव्हाण, औदूंबर सुरवसे, दिनकर घाडगे, बूथ अध्यक्ष राजेंद्र शिंगण, अरुण यादव, शंकर सोनवले, प्राणजीत पाटील, रामेश्वर आळसे महाराज, नंद‌कुमार गायकवाड, विकी पवार, सुरज बांडगी, प्रशांत यादव, उमेश जाधव, मल्लापा बामने, सुनिल मगदूम, किशोर नांगरे, धनंजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना विनायक भोसले म्हणाले की, मलकापूर शहराची वाढ झपाट्याने होत आहे. रस्त्यांसह सांडपाणी योजना अर्धवट स्थितीत असुन पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवर मलकापूरातील सत्ताधाऱ्यांनी अनावश्यक आरक्षणे लादली गेली आहेत. मोठे उद्योग हृद्दपार झाले आहेत. याला कारणीभूत शहरातील काँग्रेसचे सत्ताधारी आहेत.

विरोधकांकडे विकासकामांवर बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे जनतेचा बुध्दीभेद करत आहेत परंतू गेल्या दहा वर्षापासुन विकासकामांबाबत मतदार संघ उपेक्षित राहिल्यामुळे मतदारराजा योग्य निर्णय घेईल. अतुलबाबांनी महायुती सरकारच्या माध्यमातुन शहरासाठी २० कोटी ८० लक्ष तसेच दक्षिण मतदार संघामध्ये ७४५ कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणलेला आहे,
रोजगार, आरोग्य, शिक्षण, उद्योग क्षेत्रांमध्ये कृष्णा समुह अग्रेसर असुन सर्व सामांत्र्यांना आधार देण्याची प्रामाणिक भूमिका आमची आहे भारतीय जनता पार्टी महायुती सरकार आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहे. अतुलबाबांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून कराड दक्षिणेत परिवर्तन घडवून प्रचंड मतांनी विजयी करुन आपल्या भागाच्या विकासाच्या प्रवासातील सोबती होऊया असे मत विनायक भोसले यांनी व्यक्त

Related Articles