आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्र
Eaayush Man
Send an email
शैलेश शेवाळे यांचा आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा
60 1 minute read

कराड / प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना सामाजिक कार्यकर्ते शैलेशदादा शेवाळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आपला जाहीर पाठिंबा दिला. स्वच्छ, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेल्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मतदारांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
२६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते शैलेशदादा शेवाळे यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज पाठीमागे घेतला होता. काँग्रेसचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, अशोक दादा पाटील प्रदीप जाधव परवेज हलवाई रोहन बर्गे शाम वैद्य यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर शैलेशदादा शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शैलेशदादा शेवाळे यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना शैलेशदादा शेवाळे म्हणाले, आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास केलेला आहे. स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघातील मतदारांनी बहुसंख्येने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
60 1 minute read