क्रीडा
लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार :शैलेश शेवाळे
कराड दक्षिणेतून शैलेश शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज माघार

कराड / प्रतिनिधी : –
सामाजिक कार्यकर्ते शैलेशदादा शेवाळे यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर आपण आपला उमेदवार अर्ज मागे घेत आहे. लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे शैलेशदादा शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
२६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते शैलेशदादा शेवाळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शैलेशदादा शेवाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावत सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला आहे. गोरगरिबांचे कैवारी, प्राणी मित्र अशी शैलेशदादा शेवाळे यांची ओळख आहे. कराड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शैलेशदादा शेवाळे यांनी नुकताच आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आज (सोमवारी) अंतिम दिवशी शैलेशदादा शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर आपण अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले