सातारा जिल्हाहोम

हर्षद दादा कदम यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

दादांनी प्रचारात आघाडी घेत, थेट गावभेटीद्वारे संपर्क साधला

 

कराड / प्रतिनिधी : –

पाटण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांनी काढलेल्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरीदरम्यान जागोजागी महिलांनी हर्षद कदम यांचे औक्षण करीत स्वागत केले.
पाटण विधानसभा मतदारसंघात आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी थेट गावभेटीवर संपर्क वाढवला असून ते प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून हर्षद कदम यांना जिल्हाध्यक्ष पद देत जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर हर्षद कदम यांनी सातत्याने प्रस्थापितांच्या विरोधात रान उठवले. विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करत हर्षद कदम यांनी जनआक्रोश मोर्चाही काढला होता. तर उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले होते.
वाढत चाललेली बेरोजगारी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, पुनर्वसनाचा प्रश्न अशा विविध मुद्यांना हात घालत त्यांनी मतदारांना साद घातली आहे.तसेच तालुक्याच्या विकासाचे व्हिजन तयार करून भूस्खलन उपाययोजना, वीज वाहक तारांचे स्थानांतरण, ऐतिहासिक स्थळांचे, वारसा स्थळांचे संरक्षण, पुराची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे, पूर संरक्षण उपाययोजना आदी कामांना चालना देणार असल्याचे हर्षद कदम यांनी प्रचार भेटीत सांगितले. यावर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे अभिवचन दिले.

Related Articles