आ. पृथ्वीराज चव्हाण यांना फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

कराड/प्रतिनिधी : – कराड दक्षिणचे महाआघाडी अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सैदापूर येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड आणि परिसराचा कायापालट केला. कराडला जोडणारे रस्ते केल्यामुळे विकासाला मोठी गती मिळाली. कराड ते ओगलेवाडी व मसूर या दोन्ही रस्त्यांमुळे सैदापूर परिसराचा कायापालट झाला असून त्यांचे हे कार्य विसरता येत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी आ. चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरवून गावातील प्रचार शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात नारळ फोडण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकऱ्यांनी गावातील सर्व मंदिरे, मशीद, तसेच बौद्ध विहार येथे जावून दर्शन घेत प्रचार शुभारंभ केला.
यावेळी सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव, ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव, मानसिंगराव जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय पक्का झाल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या.