यशवंतराव मोहिते यांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जपला. त्यांच्या पिढीचा आदर्श आजकालच्या राजकीय गोंधळातील परिस्थितीत महत्वाचा ठरतो. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते यांच्या निवासस्थानी आ. चव्हाण यांनी स्व. यशवंतराव मोहिते यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. विश्र्वेंद्र मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, देवदास माने, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, रंगराव मोहिते, जगदीश मोहिते, लालासाहेब थोरात, बबन सुतार, अभिजित सोमदे, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. चव्हाण यांनी (स्व.) मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना उजाळा देत डॉ. इंद्रजित मोहिते व विश्वेंद्र मोहिते यांच्याशी चर्चा केली.