आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
विरोधकांनी स्वतः केलेल्या विकास कामाबद्दल बोलावे – डॉ. सुरेश भोसले

कराड / प्रतिनिधी : –
विरोधकांनी स्वतः केलेले विकासकामे सांगण्यासाठी मुद्दे नसल्याने ते कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट किंवा कारखान्याबाबत बोलत आहेत ही कोणती कारखाना किंवा ट्रस्टची निवडणूक नाही. असे प्रतिपादन य मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी शहरातील डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयत पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड दक्षिण साठी भरघोस निधी आणला यामुळे कराडकर अतुल भोसले यांना साथ करती या भीतीने विरोधक अशा प्रकारच्या टीका करतायेत.
विलासराव पाटील -उंडाळकर यांनी आत्तापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध केला आहे. काँग्रेस श्रेष्ठींकडे कुरगुड्या करण्यातच त्यांचे आयुष्य गेले आहे.
कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना रोजगारची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भागातील लोकांची आर्थिक उन्नती झाली. त्याचप्रमाणे शिरवळ येथे कृष्णाचे दुसरे युनिट सुरू होत आहे. डिसेंबरमध्ये या युनिटचे उद्घाटन करण्याचा आमचा मानस आहे.
कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सभासदांना चांगला दर देत आलोय आहे. यामुळे डॉक्टर अतुल भोसले यांच्या पाठीमागे कराडकर ठामपणे उभे राहतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.