सातारा जिल्हा

कराड उत्तर मतदार संघातून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हिंदकेसरी संतोष वेताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कराड / प्रतिनिधी : –

कराड उत्तर मतदारसंघातून संतोष वेताळ यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या वतीने  उमेदवार अर्ज दाखल केलेला प्रथमच एक खेळाडूंनी विधानसभा मतदारसंघात मोठी शक्ती प्रदर्शन करून प्रथम छत्रपती शिवराय यांचा आशीर्वाद घेऊन दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर महेश पाटील, बाळासाहेब खबाले व मतदार संघातील बहुसंख्य मतदार उपस्थित होते

त्यावेळी बोलताना हिंदकेसरी संतोष वेताळ म्हणाले, आज मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या वतीने आज माझा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे अर्ज शेवटपर्यंत राहणार आहे सर्व मतदारसंघातील मराठी बांधवांना इतर सर्व समाजातील लोकांना माझी विनंती सर्वसामान्य कुटुंबातील एक खेळाडू असून तुम्ही सर्वांनी मला भरभरून मतदान देऊन विजय कराव यावेळी मतदारसंघातील खेळाडू, मतदार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles