सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराड दक्षिणमधून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
साधेपणाने भरला उमेदवारी अर्ज, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन
75 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजीत मोहिते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा निलमताई येडगे, मराठा महासंघ सातारा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली जाधव, ओबीसी संघटना राज्य अध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा गितांजली थोरात, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, माजी सभापती रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही निवडणूक महत्त्वाची असून राज्य सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देते. तर दुसरीकडे महिलांचा अपमान केला जात आहे. नगर जिल्ह्यात घडलेल्या प्रकार अत्यंत निंदनीय असून याबाबत भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. कराड दक्षिणमध्ये दोन विचारांची लढाई आहे. या ठिकाणी जातीवादी प्रवृत्तीला रोखायचे आहे. येथील जनता महाविकास आघाडीला बहुमत देईल.
तसेच महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक परंपरा आहे. काहींनी या संस्कृतीला डाग लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता, समविचारी पक्ष एकत्र मिळून हा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
75 1 minute read



