सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
मनोज घोरपडे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल
52 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांनी शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील कृष्णा नाक्यावरून दत्त चौकापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करत समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढली.
त्यानंतर येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी उदयनराजे भोसले म्हणाले, मनोज घोरपडे यांनी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामे आणली आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे ते निवडून आल्यात जमा आहेत. तसेच मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे एकत्र मिळून प्रयत्न करतील.
मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी 2014 पासून निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. तसेच पश्चिम भागातील तारळी उपसा प्रकल्प, तसेच हिंगोली उपसा सिंचन योजनेतून 100 मीटर हेडपर्यंत पाणी पोहोचवण्याची योजना प्रस्तावित आहे. मतदारसंघाचा संपूर्ण विकास हाच आमचा अजेंडा राहील. उत्तरेतील सर्व नेत्यांच्या समन्वयातून आपल्यावर भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी दिली असून सर्वांच्या सहकार्याने एकदिलाने आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब – घोरपडे समर्थकांमध्ये वादावादी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. बाळासाहेब पाटील आणि महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे या दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी भव्य शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. येथील दत्त चौकात दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी घोषणाबाजी करण्यावरून दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
52 1 minute read