आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यासातारा जिल्हा

मनोजदादा घोरपडे सोमवारी भव्यशक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार 

 

कराड / प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून  मनोज दादा घोरपडे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे कमळ चिन्ह वर मनोज दादा घोरपडे या निवडणुकीला सामोरे जात आहेत दरम्यान कराड उत्तर मतदारसंघातील जनतेची प्रतिक्षा संपले असून सोमवारी म्हणून दादा घोरपडे भव्यशक्ती करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९ वाजता कॉटेज हॉस्पिटल कराड येथून भव्यशक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील बंधू भगिनी यांनी सकाळी नऊ वाजता कॉटेज हॉस्पिटल कराड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कराड उत्तर भाजपच्या वतीने केले आहे.

Related Articles