
कराड/प्रतिनिधी : –
येथील कराड मर्चंट संस्थेने दिवाळी सणानिमित्त नवीन वाहन खरेदीसाठी वाहन तारण योजना लागू केली असून यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांना विशेष अशा 9 टक्के व्याजदराने कर्ज वितरण करण्यात येणार आहे.
संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांच्या हस्ते या योजनेंतर्गत दोन नवीन वाहनांचे वितरण करण्यात आले. यामध्ये युवा उद्योजक महेश पाटील यांना टोयाटो लिजेंडर व अजय पावसकर यांना स्कॉरपीओची चावी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना श्री. मिणीयार यांनी या योजनेचा लाभ युवा उद्योजक, व्यावसायिक अशा सर्व स्तरातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले. तसेच महिला लघु उद्योजकांसाठी 9.90 टक्के व्याजदराची कर्ज योजनाही लागू करण्यात आली आहे. या संधीचा महिलांनी लाभ घ्यावा. संस्थेने ठेवीवर 9.10 विशेष व्याजदर व जेष्ठ नागरिकांसाठी 10.10 टक्के व्याजदर लागू केला असून त्याचाही सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव यादव, शाखा प्रमुख अरुण पवार व सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.