सातारा जिल्हाहोम

चौथ्या दिवशी कराड दक्षिणमधून दोन उमेदवारी अर्ज दाखल

कराड/प्रतिनिधी : –

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवार, दि. 25 रोजी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
तर 5 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. तसेच 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. एकूण 11 व्यक्तींनी 15 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत.

याबाबतची माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरु झाले असून पहिल्या दिवशी 30, दुसऱ्या दिवशी 22, तिसऱ्या दिवशी 8, तर आज चौथ्या दिवशी 3 जणांनी एकूण 5 नामनिर्देशनपत्रे घेतली असून आजअखेर एकूण 65 नामनिर्देशन पत्रांचे वाटप झाले आहे.

दक्षिणेतून आजअखेर 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवारांनी 4 अर्ज व 6 अपक्ष उमेदवारांनी 6 अर्ज दाखल केले आहेत. तर आज विद्याधर कृष्णा गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आणि गणेश शिवाजी कापसे (अपक्ष) त्यांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.

तर 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. आज एकूण 11 व्यक्तींनी 15 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. आजअखेर एकूण 3 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून एकूण 43 व्यक्तींनी 60 नामनिर्देशनपत्रे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख व अनिकेत पाटील यांनी दिली आहे.

Related Articles