आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र या अभियानात युवकांनी  सहभाग घ्यावा – अनुप मोरे

सातारा / प्रतिनिधी : –

आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे सातारा येथील युवकांशी संवाद कार्यक्रमात आवाहन पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पु्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने सध्या राज्यभर ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाच्या प्रचारार्थ संवाद दौरा महाराष्ट्रभर सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय स्तरावर कार्य करणाऱ्या अनेक युवक-युवतींशी यावेळी संवाद झाला. ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाचा हेतू व कार्य यावेळी उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले की, विकसित महाराष्ट्राचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी माझा महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर प्रचंड विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या तरुणांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने हा संवाद दौरा सुरू आहे. तसेच विकसित महाराष्ट्राचे महत्त्वाचे स्तंभ म्हणजेच युवाच्या कलागुणांना वाव देणे, महिलांना आत्मनिर्भर करणे, शेतकरी सर्वांगीण विकसित होणे ही काळाची गरज असून प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी सुरू केलेला विकसित महाराष्ट्र हा उपक्रम आदर्शवादी ठरेल असे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव सिंग यांनी सांगितले. सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी व युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक मंडला मध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.तसेच शेकडो युवकांच्या उपस्थिती मधे बाइक रैली काढण्यात आली.जिल्ह्यात भाजपा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील याबाबत विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री  वैभव सिंग, राष्ट्रीय मीडिया प्रभारी  अमनदीप, प्रदेश महामंत्री  सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष  अमृत मारणे, प्रदेश उपाध्यक्ष  प्रिया पवार, प्रदेश उपाध्यक्ष  नवनाथ पठारे, प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे , सातारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,विद्यार्थी आघाडीचे  रमाकांत कापसे, प्रदेश सचिव  रौनक शेट्टी,  सचिन जायभाये, सरचिटणीस हर्षवर्धन शेळके,रोहित सावंत,अमोल कांबळे,शैलेश सपकाळ,रणजीत शिंदे,संतोष खताळ,अक्षय भोसले,तेजस कदम,प्रशांत जाधव,विश्वजीत जाधव,यशोवर्धन मुतालिक,सायली धोत्रे,वैष्णवी पलसे,ओमकार पाटील,संदीप माने,
श्रीकांत पिसाळ,आशीष सकुंडे,सायली धोत्रे,सनी साबळे,विजय पवार,तेजस कदम,नीलेश यादव,सागर धनवडे,प्रतिक शिंदे गौरव मोरे,रोहित किर्दत,मंदार जाधव,श्री शिंदे,राहुल राठोड,प्रथमेश इनामदार, प्रथमेश मोरे जिल्हा युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या संवाद दौऱ्यानिमित्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा भाजपा युवा मोर्चा प्रभारी प्रिया पवार यांनी केले. पायल जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles