सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराड दक्षिणमध्ये परिवर्तन अटळ – डॉ. अतुल भोसले
260 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये आतापर्यंत तब्बल 745 कोटींचा विकासनिधी आणला आहे. यामध्ये जनतेचा सेवक म्हणून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे. जनतेचा महायुतीकडे कल असून त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील. जनतेने मनात आणलं, तर बदल घडू शकतो, असा विश्वास डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
गुरुवार, दि. 24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी कराड दक्षिणमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. अतुल भोसले यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह माजी सैनिक, वारकरी महिला भगिनी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले यांनी कोणत्याही प्रकारे मोठे शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, कराड दक्षिणची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे येथे दोन्हीही परस्परविरोधी उमेदवाराकडून नेहमी मोठे शक्ती प्रदर्शन केले जाते. मात्र, यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात बाजी मारली असून वारकरी, महिला भगिनी, तसेच माजी सैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांनी साधेपणाने अर्ज दाखल केल्याने कराड शहरासह संपूर्ण मतदारसंघात याबाबत चर्चा रंगली होती.
260 1 minute read