महाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
महाविकास आघाडी आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू – संजय गाडे
कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा
59 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना मिळालेले आहेत. राज्यात सध्या तब्बल 65 हजार मराठी शाळा बंद झाल्या आहेत. यामागे शिक्षणावर घाला घालून सर्वसामान्यांच्या मुलांचे शिक्षण बंद पाडण्याचा डाव आहे. महायुतीच्या या निर्णयाला महाविकास आघाडीचाही अंतर्गत पाठिंबा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय गाडे यांनी केला.
कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतत बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व महासचिव शरद गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय गाडे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचा आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बळकट करण्यासाठी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ 10-15 वर्षांपूर्वीच आरक्षित व्हायला पाहिजे होता. येथील एससी, एसटी, ओबीसी असे म्हणून सुमारे 58 ते 60 टक्के मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आरपीआयचे दोन्ही गट व ओबीसी बांधवांनी आपणास मतदान करून विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वंचितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी निवडणूक रिंगणात
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा), तर भाजपतर्फे डॉ. अतुल भोसले (बाबा) हे दोन्ही दिग्गज नेते निवडणूक रिंगणात आहेत. परंतु, वंचितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून या दोन्ही बाबांना पाडण्याचा विडा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण उचला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
59 1 minute read