सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पिंक, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्रे
67 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनातर्फे विविध मतदार केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदान केंद्र क्रमांक 239 उंब्रज, ता. कराड हे केंद्र पिंक बुथ सखी असणार आहे. या केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी (BLO), पोलीस कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या केंद्राला गुलाबी किंवा गुलाबी छटा असणारे विविध रंग दिले जातील.
मतदान केंद्र क्रमांक 134 अपशिंगे, ता. सातारा हे केंद्र दिव्यांग मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी (BLO) व सुरक्षा कर्मचारी हे दिव्यांग असणार आहेत.
मतदान केंद्र क्रमांक 156 साप, ता. कोरेगाव हे केंद्र युवा मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी,स्थानिक मतदान कर्मचारी (BLO) व सुरक्षा कर्मचारी हे युवा असणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक 14 नागठाणे, ता. सातारा, 148 रहिमतपूर, ता. कोरेगाव, 233 उंब्रज, ता. कराड, 303 पुसेसावळी, ता. खटाव ही केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून स्थापन केली जाणार आहेत.
सुशोभित आकर्षक अशा या केंद्रात पेयजल, व्हीलचेयर, रॅप वॉक, आरोग्य सेवक आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
मतदान केंद्र क्रमांक 285 वाघेरी, ता. कराड हे मतदान केंद्र पर्दानशी केंद्र असणार आहे. या केंद्रावर महिला मतदान कर्मचाऱ्यांच्या साह्याने पर्दानशी मुस्लिम महिला मतदारांची ओळख ओळख पटवण्यासाठी खास सुविधा असणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी खटाव डॉ. जस्मिन शेख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी, कोरेगाव लालासाहेब गावडे यांनी ही केंद्रे स्थापन करण्याची नियोजन केले आहे.
67 1 minute read