सातारा जिल्हाहोम

पोलीस प्रशासनाकडून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी

कराड/प्रतिनिधी : –
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी पोलीस प्रशासनाकडून तपासण्यात आल्या.
स्ट्रॉंगच्या बाहेरील मंडप व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियोजन, नामनिर्देशानाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त, मतमोजणीचा हॉल, ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था यासंबंधी कराड उत्तर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या.
याप्रसंगी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराड उत्तर निवडणूक प्रशासनातील अधिकारी, कराड पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Related Articles