सातारा जिल्हाहोम

विलासकाकांच्या विचारांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी – डॉ. संजय कळमकर 

कोयना दूध संघावर कोजागिरी पोर्णिमा उत्साहात साजरी 

कराड/प्रतिनिधी : –

सहकारातून समृद्धी करण्यासाठी  लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांनी विशेष प्रयत्न करून सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातून सत्तेची संधी दिली. आज-काल राजकारणाची झालेली अवस्था आपण सर्वजण पाहत आहोत. संध्याकाळी एका पक्षात असणारा नेता सकाळी कोणत्या पक्षात असेल हे सांगता येत नाही. मात्र आमदारकीची सप्तपदी पूर्ण करून राज्यात तत्त्वनिष्ठ, एकनिष्ठ व आदर्श काम करणाऱ्या स्वर्गीय विलास काकांनी आदर्श विचारांची पिढी घडवली. त्यांच्या स्मृती जतन करत असताना आपण सर्वांनी काकांच्या विचारांचा आदर्श पुढे घेऊन चालावे, असे असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी व्यक्त केले.

खोडशी (ता. कराड) येथील कोयना संघावर प्रतिवर्षी प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा माजी मंत्री स्व विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केली होती. आज त्याच उत्साहात उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोजागरी साजरी झाली.

यावेळी माजी सभापती आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, राफीकशेठ बागवान, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते,  बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, प्रा. धनाजी काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उदयसिंह पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, आज कराड तालुक्यात मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी आपल्यात नाहीत. आशा स्थितीत कराड तालुक्याची आचार विचाराची घडी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर  आहे. कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त साधून तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

ते म्हणाले, ग्रामीण माणूस, शेतकरी यांच्या प्रगती साठी सहकार चळवळ टिकली पाहिजे.  सहकारातील ऊस कारखानदारी आज आपण यशस्वी करून दाखवली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात काम करत असताना खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र, संघर्षाचा शेवट यशात होतो, हे गेल्या काही दिवसांपासून जनतेने पाहिले आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चंद्र प्रकाशात दुग्धपानाच्या आस्वाद बरोबर व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे विनोदी किस्से व विचार ऐकत प्रबोधनाची कोजागिरी साजरी केली. यानिमित्ताने कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांची सांघिक विचारांची देवाण घेवाणही झाली. तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट ठरले.

या कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती संभाजी काकडे, हणमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, प्रदीप पाटील, सतीश इंगवले, नितीन ढापरे, आत्माराम जाधव कोयना दूध संघाचे संचालक संचालक संपतराव इंगवले, निवासराव निकम, बाबुराव धोकटे, सुदाम चव्हाण, शिवाजीराव शिंदे, दीपक पिसाळ, सुदाम चव्हाण, तानाजी शेवाळे, धनाजी पाटील, शिवाजी गरुड, शंकर पवार, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव-दुशेरेकर यांनी करून दिला. आभार संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी मानले.

 

Related Articles