सातारा जिल्हाहोम

मलकापुरच्या समाजप्रबोधन वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

कराड/प्रतिनिधी : –

समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर, ता. कराड येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष शेतीमित्र मा.अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

‘वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ‘एका पुस्तकाचे वाचन’ हा उपक्रम आ. च. विद्यालय मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, प्रे. च. कन्याशाळा मलकापूर या शाळांतील एका वर्गावर राबवण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. वैशाली शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक सदस्य सौ. रंजना काटवटे यांनी केले. उपाध्यक्षा सौ. सुरेखा खंडागळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. खजिनदार विशांत थोरात यांनी वाचनाचे फायदे स्पष्ट केले. मुख्याधिपिका सौ. एस. व्ही. भिसे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ याचा अर्थ विशद केला. संचालक सदस्य सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास एम. पी. फराळे, सौ. वनिता येडगे, सचिन शिंदे, सौ. ज्योती शिंदे, हेमंत शिर्के, ग्रामस्थ, सभामद उपस्थित होते.

Related Articles