महाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड उत्तरसाठी ६ कोटी रूपयांचा निधी मंजूर
43 5 minutes read

मसूर / प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना भूकंप विकास निधी सन २०२४-२५ अंतर्गत कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील व कराड तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांकरीता रक्कम रूपये ६.०० कोटी रूपये मंजूर झाला असून सदरची कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले
यामध्ये वराडे ता. कराड येथे सिध्दार्थ फुके यांच्या घरापासून ते गुलाबराव इंगळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे भिमसेन महाराज दिल्ली दरवाजा ते समर्थ स्थापीत मारूती मंदिर ते जुने पोस्ट ऑफिस पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वडगांव (उंब्रज) ता.कराड येथील ग्रामपंचायत परिसराला वॉल कंपाऊंड बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, साबळवाडी ता. कराड येथे स्मशानभूमीमध्ये वेटींग शेड बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कोपर्डे हवेली ता. कराड येथे बबन यशवंत चव्हाण यांचे घरापासून ते संजय शिवाजी चव्हाण यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, पेरले ता. कराड येथील कदम मळावस्ती येथे स्मशानभूमी बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, मसूर ता. कराड येथे चावडी चौक ते बाजारपेठ पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, करवडी ता. कराड येथे बौध्द वस्तीमध्ये लक्ष्मी देवी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उत्तर कोपर्डे ता. कराड येथील श्री. हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, तासवडे ता. कराड येथील अंगणवाडी ते विशाल खरात यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे व बंदिस्त आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, निगडी ता. कराड येथील मागासवर्गीय वसाहतीमध्ये व्यायामशाळा इमारत बांधणे व व्यायाम साहित्य बसविणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, शिरवडे ता.कराड येथील शिवाजी नथुराम जगदाळे यांच्या घरापासून ते किसन जोतिराम जगदाळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, शिवडे ता. कराड येथील मराठी शाळेपाठीमागून ते जांभळे गिरणीपर्यंत जाणारा पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हनुमानवाडी ता.कराड येथील दत्त मंदिर ते शंकर निवृत्ती नलवडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व रस्त्याच्या पश्चिम बाजूने आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०,०० लक्ष, भोसलेवाडी ता. कराड येथील हणमंत महादेव भोसले ते संतोष यशवंत भोसले यांच्या घरापासून व आशोक रामचंद्र पवार ते गोरख पंचम भोसले यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हजारमाची (सदाशिवगड) येथे लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी शेड व निवारा शेड बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे भैरोबा मंदिर ते सुतार यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, मेरवेवाडी ता. कराड येथे आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वडोली निळेश्वर ता. कराड येथे ग्रामपंचायत ते डुबलवाडा पाठीमागुन सोसायटी पर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, किवळ ता. कराड येथील महादेव मंदिरासमोरील सामाजिक सभागृहाचे उर्वरीत काम करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कोणेगांव ता. कराड येथील तालीम गृह ते निवृत्ती गुजले (गुरूजी) यांच्या घरापर्यतचा उर्वरीत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कोपर्डे हवेली ता. कराड येथील महादेव मंदिरासमोरील सामाजिक सभागृह बंदिस्त करणे रक्कम रूपये ५.०० लक्ष, कोरीवळे ता. कराड येथील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हेळगांव ता. कराड येथे विठ्ठल मंदिराशेजारील खुल्या जागेत बंदिस्त सभामंडप बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, आदर्शनगर ता. कराड येथे स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे व स्मशानभूमीची दुरूस्ती करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथील भैरोबा मंदिर ते शेजवळ गल्ली पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, रक्कम रूपये १०.०० लक्ष, डफळवाडी ता.कराड येथे शवदाहिनी व वेटींग शेड बांधणे, रक्कम रूपये १०.०० लक्ष, शितळवाडी ता.कराड येथे भैरवनाथ मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधणे, रक्कम रूपये १०.०० लक्ष, ओगलेवाडी ता. कराड येथे मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे, रक्कम रूपये १०.०० लक्ष, पिंपरी ता. कराड येथील नारायण गणपती वांगडे यांच्या घरापासून ते जगदेव येवले यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे व बंदिस्त आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, खोडजाईवाडी ता. कराड येथे खोडजाईमाता मंदिरासमोरील जागेत काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वडोली भिकेश्वर ता. कराड येथे महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कळंत्रेवाडी ता. कराड येथे धिरज थोरात यांच्या घरापासून ते पाण्याच्या टाकी पर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रक्कम रूपये ६.०० लक्ष, चरेगांव ता. कराड येथे मागासवर्गीय सामाजिक सभागृहाची दुरूस्ती व सुशोभिकरण करणे रक्कम रूपये ३.०० लक्ष, कोर्टी ता. कराड येथील सिध्देश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, पेरले ता. कराड येथील श्री. गणेश, दत्त मंदिर व श्री. हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे सुशोभिकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, यादववाडी ता. कराड येथील जोतीराम भगवान यादव यांचे घरापासून ते सिंधुताई बाळासो देसाई यांचे घरापर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व छोटे सी.डी. वर्क बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, माळवाडी ता. कराड येथे सामाजिक सभागृह बांधणे जमणे ८.०० लक्ष, शिरगाव ता. कराड हुडीवस्ती ते पाल जाणारा महिपती रामचंद्र यादव यांच्या शेतघरापर्यंतचा रस्ता खडीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कोरेगांव ता. कराड येथे रा.मा १४२ ते देसाईमळाकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, टेंभू ता. कराड येथे टेंभू ते कोरेगांव हद्दीवरील रस्ता रा.मा १४२ ते कॅनॉल पर्यंतचा रस्ता सुधारणा
करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, इंदोली ता. कराड येथील आशा पोकळे यांच्या घरापासून ते दवाखान्यापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे (२३० फूट लांबी) रक्कम रूपये ५.०० लक्ष, शिरवडे ता. कराड येथे दादासो आप्पा पवार यांच्या घरापासून ते रामचंद्र यशवंत जगदाळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, शिवाजीनगर (मांगवाडी) ता. कराड येथे ग्रामपंचायत इमारतीच्या वरती अभ्यासिका हॉल बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, बनवडी ता. कराड गजानन सरस्वती कॉलनीमध्ये स्वामी समर्थ महाराज
मंदिरासमारे सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, डफळवाडी ता. कराड येथे प्राथमिक शाळा ते लक्ष्मी मंदिरापर्यंतचा (४०० मीटर) रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, इंदोली ता. कराड
येथील प्रकाश जाधव यांच्या घरापासून ते बाळू वाघ यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ५.०० लक्ष, पाडळी (हे.) ता. कराड येथे प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे श्री. जानाईदेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, पाल ता. कराड येथे पाल पेंबर मधील खंडोबा मंदिरा शेजारील ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वाण्याचीवाडी ता. कराड येथे ग्रामपंचायत इमारतीवरती सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, सैदापूर ता. कराड येथील आर्मी निवासकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ५.०० लक्ष, उत्तर कोपर्डे ता. कराड (दत्तनगर) येथे श्री. एकनाथ गणपती चव्हाण यांचे घरापासून ते श्री. संभाजी ज्ञानू चव्हाण यांचे घरापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला आर.सी.सी. बंदिस्त गटर बांधणे रक्कम रूपये ५.०० लक्ष, गोसावेवाडी ता. कराड येथील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ७.०० लक्ष, अंतवडी ता. कराड येथील शहीद स्मारक सुशोभिकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, बानुगडेवाडी ता. कराड येथील मुस्लीम समाज दर्गामध्ये काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ७.०० लक्ष, भवानवाडी ता. कराड येथील ग्रामपंचायत कार्यालय ते दिलीप यादव यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ७.०० लक्ष, चिंचणी ता. कराड येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रूपये ७.०० लक्ष, कामथी ता. कराड येथे तालीमगृह बांधणे, रक्कम रूपये १०.०० लक्ष, कालगांव ता. कराड येथे शादीखाना बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हजारमाची ता. कराड येथे वार्ड क्र.३ मधील सुर्वे चाळ येथील जगन्नाथ सुर्वे यांचे घर ते रामचंद्र सुर्वे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे व आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कांबीरवाडी ता. कराड येथील स्मशानभूमीमध्ये दुरूस्ती करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व संरक्षक भिंत बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे भिम-कुंती प्रांगणात सभामंडप बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, चोरे ता. कराड येथे गावअंतर्गत बंदिस्त आर.सी.सी.गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हरपळवाडी ता. कराड येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष या कामांचा समावेश आहे.
43 5 minutes read