माझ्या विजयात नारीशक्तीचा सिंहाचा वाटा असेल – मनोजदादा घोरपडे

कराड / प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्यामार्फत प्रत्येक जिल्हा परिषद गटात मनोजबंध कार्यक्रमांतर्गत महिला मिळवण्याचे आयोजन करण्यात आले होते. मसूर येथील सुयोग मंगल कार्यालय येथे काल हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना मनोजदादा म्हणाले संपूर्ण कराड उत्तर मध्ये प्रत्येक गटांमध्ये महिलांची मिळावे घेतलेले आहेत. त्याला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मसूर मधील मेळावा हा गर्दीचा उच्चांक आहे. कराड उत्तर मधील भगिनींचे प्रेम पाहून येणाऱ्या विधानसभेला माझ्या विजयात नारी शक्तीचा सिंहाचा वाटा असेल. संपूर्ण मतदारसंघांमध्ये लडकी बहीन योजनेमुळे सर्व माता भगिनी खुश आहेत त्यांना आजपर्यंत जे मिळाले नाही ते महयुती सरकारने दीले.महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन चालू केल्याने संपूर्ण महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. येणाऱ्या विधानसभेला सर्व माता-भगिनी भाजपला व महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देणार आहेत. कराड उत्तर मध्ये स्वाभिमानी महिला सुखी मंचच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील महिलेला रोजच्या दैनंदिन जीवनाच्या पलीकडे जीवन जगण्यासाठी कार्यरत आहे. या माध्यमातून महिलांना मुक्तव्यासपीठ मिळाले असून येथे येणारी प्रत्येक प्रत्येक महिला मनसोक्त मनोरंजनाचा आनंद घेऊन आपल्या जीवनातील काही क्षण आनंदाने घालवत असते. त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंदच मला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असतो. आपल्या माता भगिनींच्या आशीर्वादावरती येणाऱ्या विधानसभेला आपल्या सर्वांचे प्रतीनिधित्व करण्याची संधी मिळावी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो
यावेळी मंगलताई घोरपडे, समता घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, उषा गायकवाड, उषा जगदाळे, आरती मोरे,संगीता पाटील, अश्विनी जगदाळे, अंजली जगदाळे ,शोभा जगदाळे ,सुषमा कांबिरे, रूपाली शहा, रूपाली इंगवले, पूनम कुंभार, प्रभावती सूर्यवंशी, पूजा साळुंखे, दीपिका जगदाळे,विद्या घोलप, राखी पवार, वैशाली भुजबळ, संगीता माळी, रेखा पाटील, वैशाली माळी, सविता घाडगे, भारती शेडगे, पुनम इंगवले, सिंधुताई जाधव,संगीता कांबळे, आशा घोलप, स्वाती जाधव, संगीता जाधव, स्नेहा पाटील, अमिता माने, पूजा जाधव, विमल चव्हाण, पूनम कुंभार आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
मसूर मधील मेळाव्यातील गर्दीचा उच्चांक पाहता कराड उत्तर मधील भगिनींचे प्रेम पाहून येणाऱ्या विधानसभे विजयात नारी शक्तीचा सिंहाचा वाटा उचलणारच तसेच योजनेमुळे सर्व माता भगिनी खुश आहेत त्यांना आजपर्यंत जे मिळाले नाही ते महयुती सरकारने दीले म्हणूनच आम्ही मनोज दादांच्या पाठीमागे उभे राहू असा ठाम विश्वास उपस्थित महिलांनी दिला.