गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाच्या वतीने सुनील कुलकर्णी यांचा सत्कार

कराड / प्रतिनिधी :-
कराड येथील गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाची नवरात्रीतील उपासना सोमवार पेठेतील जयंत दीनानाथ जोशी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली उपासना मंडळातील सदस्य सुनील रामचंद्र कुलकर्णी एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर कार्यरत आहेत भारतातील पन्नास डेव्हलपमेंट ऑफिससरांची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक सुनील कुलकर्णी यांना मिळाल्याबद्दल गोंदवलेकर महाराजांचे ते साधक असल्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही के कुलकर्णी सर यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पत्नी सौ भाग्यश्री कुलकर्णी यांचीही ओटी भरून सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मंडळातील साधक सुनील दाभोळे अमित पल्ले रमेश कुलकर्णी दत्ता शिंदे अवधूत टोणपे संध्या जोशी मंजिरी कुलकर्णी रेवा जोशी सदा उमराणी जयंत जोशी यांच्या येथे गोंदवलेकर महाराजांचे राम नाम जपत व अन्नदान वाटप करण्यात आले कार्यक्रमात डॉ शीला कुलकर्णी सुनील कुलकर्णी यांनीही आपली मनोगत व्यक्त केली तर आभार अनंत लाड यांनी मानले यावेळी मंडळातील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते