संग्रामबापू घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
संग्राम दादा मत्त्यापूर येथे शुभेच्छा स्वीकारणार

कराड / प्रतिनिधी : –
भारतीय जनता पार्टीचे नेते मनोज दादा घोरपडे यांचे छोटे बंधू संग्राम बापू घोरपडे कार्यकारी संचालक खटाव माण साखर कारखाना यांचा वाढदिवस २ ऑक्टोबर रोजी मत्त्यापूर येथे साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनोजदादा युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने देण्यात आलेली.
२ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी युवा उद्योजक संग्राम बापू यांचा वाढदिवस साजरा होत आहे. सकाळी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन कुटुंबांच्याकडून औक्षण करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता खंडोबाची पाली येथे खंडेरायाचा अभिषेक करण्यात येणार आहे. देशमुख नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. अपशीगे मिलिटरी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केलेले आहे. तसेच कराड उत्तर मधील अनेक गावामध्ये फळ वाटप, शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप, विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत त्यापूर्वी या त्यांच्या मूळ गावी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी मनोजदादा युवा मंच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मत्त्यापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहान मनोजदादा घोरपडे युवा मंच यांच्यावतीने करण्यात आले आहे.