आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामनोरंजन

कराड उत्तरेत मनोज पर्वाचा जोरदार झंजावात

ओगलेवाडी येथील मनोजबंध महिलांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

कराड /प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात युवा नेते मनोज दादा घोरपडे यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून, स्वाभिमानी महिला मंच कराड उत्तर च्या वतीने आयोजित केलेल्या ओगलेवाडी ता. कराड येथे झालेल्या मनोजबंध या महिलांच्या समारंभाला ७ हजार हून अधिक महिलांनी उपस्थित लावून भावी आमदार मनोजदादा घोरपडे असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई घोरपडे, स्वाभिमानी महिला मंच अध्यक्ष समताताई घोरपडे, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगलाताई बनसोडे, भाजपा कराड उत्तर अध्यक्षा सौ. सीमताई घार्गे यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती.

ओगलेवाडी विभागात प्रथमच झालेल्या महिलांच्या कार्यक्रमास रेकोर्डब्रेक गर्दी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची युवा नेते मनोजला घोरपडे यांची या समारंभात जोरदार एन्ट्री होताच हजारो महिलांनी हात उंचावून व जोरदार घोषणाबाजी करून मनोज दादांचे स्वागत केले यावेळी एकच वादा मनोज दादा कराड उत्तरचा आमदार… या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या मनोजबंध कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

यावेळी बोलताना मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महिलांनी एकजुटीने मोठ्या प्रमाणात दिलेला पाठिंबा हीच विधानसभेच्या विजयाची नांदी ठरणार असून महायुतीच्या माध्यमातून महिलांच्यासाठी लाडकी बहिण योजना, ५०% सवलतीत एसटी प्रवास, ३ मोफत सिलेंडर इत्यादीमुळे महिलांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन निश्चित असून या परिवर्तनात मतदार संघातील महिला या आघाडीवर असतील. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या परिवर्तनाच्या लढाईत आपलाच विजय निश्चित आहे. महिलांच्यासाठी आयोजित केलेल्या मनोजबंध या सर्वच कार्यक्रमासाठी कराड उत्तर मधील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व भगिनींचे मनःपूर्वक आभारी आहे. यावेळी उपस्थित असलेल्या कराड उत्तर मधील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुजाता उपरे ,जयश्री पवार,सुप्रिया वंजारी ,अनिता चव्हाण,मेघा चव्हाण,संगीता शिंदे,संगीता भुसारे,शितल शिंदे,सोनाली डुबल,प्रतीभा साखरे,सुषमा पोळ,अर्चना भोसले,सुप्रिया पिसाळ,विजया डुबल,सुनिता डुबल आदी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपक साबळे सर यांनी तर आभार कार्याध्यक्ष तेजस्विनी घोरपडे यांनी केले.

 

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे यांचा सन्मान….

करवडी कराड गावच्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी मंगलाताई बनसोडे व नितीन बनसोडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला हजारो महिलांच्या विनंतीवरून यावेळी मंगलाताई बनसोडे यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षी देखील अनोखा नृत्याविष्कार सादर करून महिलांची मने जिंकली.

 

Related Articles