दादासाहेब मोकाशी संकुलामध्ये कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

कराड प्रतिनिधी : –
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान राजमाची संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी अभियांत्रिक व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 व बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अहमदनगर, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच संघांचा सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवण्यात येणार आहे; या स्पर्धेसाठी जवळजवळ 70 ते 75 संघ महाविद्यालयाच्या संकुलामध्ये उपस्थित राहतील.
महाविद्यालयातील क्रीडा संकुलामध्ये आजपर्यंत हॉलीबॉल, खो-खो, मल्लखांब, चेस, बुद्धिबळ, मॅटवरील कुस्ती, वेटलिफ्टिंग यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन केले होते. यावर्षी कबड्डी या सांघिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाविद्यालयास विद्यापीठाकडून प्राप्त झाला आहे.
आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा देऊन क्रीडास्पर्धा सर्वोत्कृष पद्धतीने यशस्वी करण्यासाठी मोलाचे प्रोत्साहन व सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. कबड्डी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव अभिजीत मोकाशी साहेब उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक विलास चौधरी यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले असून कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. पाटील, प्रा. डी. एस. सूर्यवंशी, पवार मॅडम या सर्व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या स्पर्धेच्या आयोजनासाठी कटिबद्ध असतील.