मनोरंजनमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराडमध्ये धर्मवीर २ चा पहिला शो फ्री
114 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
शिवसेना प्रणित आनंदयात्री यांच्याकडून धर्मवीर २ या चित्रपटाचा पहिला शो सर्वांसाठी फ्री ठेवण्यात आला आहे. येथील प्रभात टॉकीजमध्ये 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता शो फ्री दाखवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय मोहिते यांनी दिली. यावेळी तालुका प्रमुख काकासाहेब जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच 27 रोजी शिवसेना प्रणित आनंदयात्री यांच्यातर्फे कराड शहरातून भव्य बाईक व रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली चौकातून प्रारंभ होईल. त्यानंतर ही रॅली विजय दिवस चौक, कृष्णा नाका, मुख्य पेठलाईन, यशवंत हायस्कूल मार्गे पुन्हा प्रभात टॉकीज जवळ आल्यानंतर येथे रॅलीची सांगता करण्यात येणार आहे. तरी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच धर्मवीर २ या चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा, असे आवाहन अक्षय मोहिते यांनी केले आहे.
114 Less than a minute