उंब्रज हॉस्पिटल उंब्रज येथील डॉक्टरांकडून रुग्णाच्या मानसिक व शारीरिक छळ
अभिजीत वाढते यांचा आरोप; डॉक्टरांचा हलगर्जीपणा, पोलिसांचेही दुर्लक्ष, रिपब्लिकन पक्ष आक्रमक

कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील उंब्रज येथील उंब्रज हॉस्पिटल उंब्रज याठिकाणी दलित समाजातील कार्यकर्ता अभिजीत वाढते याचा डॉक्टरांनी उपचारादरम्यान शारीरिक व मानसिक छळ केला आहे. वाढते हे सध्या जखमी असून त्यांनी न्यायासाठी अर्धनग्न आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडेही दाद मागितली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आक्रमक झालेल्या रिपब्लिकन पक्षाने मंगळवार, दि. 24 रोजी कराड तहसील कार्यालय, तसेच साताऱ्यात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतची माहिती देण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी कराड पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पदाह्दिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष ओव्हाळ म्हणाले, उंब्रज हॉस्पिटल उंब्रज याह्तीकानी उपचारासाठी दलित समाजातील अभिजीत वाढते हे दाखल झाले होते. परंतु, उपचारादरम्यान येथील डॉक्टरांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे अभिजीत वाटते यांचे म्हणणे आहे. तसेच 14 तारखेला त्यांना रात्री 12 वाजता वाढते याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. संदर्भात डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारे विचारणा केली नाही.
वास्तविक, 15 तारखेला अभिजीत वाढते यांना सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार होता. तो दिलाही. परंतु, 14 तारखेच्या रात्रीच त्याच्या लघवीच्या जागेत पाईप घालून, त्याच्या तोंडावर उशी ठेवून, तसेच त्याचे पाय बांधून डॉक्टरांना नेमके कशा प्रकारचे उपचार करायचे होते? असा प्रश्नही रिपब्लिकन पक्षातर्फे ओव्हाळ यांनी उपस्थित केला.
अभिजीत वाटते याच्यावर झालेल्या अन्यायाबाबत, तसेच त्याच्या झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत तो न्याय मागत आहे. याबाबत त्याने उंब्रज पोलिसांकडेही दाद मागितली होती. परंतु, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर पोलिसांनी काही स्थानिक डॉक्टरांना बोलावून तडजोड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपी यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु, ही तडजोड यशस्वी झाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच चार-पाच दिवस होऊनही गुन्हा दाखल झाला नाही, तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी, वॉर्डबॉय यांचीही चौकशी झाली नाही. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही पहावा, त्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट होतील, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे.
अन्यथा, मंगळवार, दि. 24 रोजी कराड तहसील कार्यालसमोर निदर्शने करण्यात येतील. तसेच सातारा येथेही रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना भेटून दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.