सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
प्राथमिक शिक्षक बँकेच्या शतक महोत्सवास प्रारंभ
56 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
२१ ऑक्टोंबर १९२४ रोजी स्थापन झालेली प्राथमिक शिक्षक बँक आज १०० वर्षे पूर्ण करत आहे. या “बँकेचा शतक महोत्सवी समारंभ” रविवार, दि. २२ रोजी सकाळी १० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे साजरा होणार असून आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. नितीन पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेव पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, आ. अरूण लाड, आ. जयंत आसगावकर, सातारा जिल्हा नागरी सह. बँकेचे अध्यक्ष अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या १०० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी “शतार्थ” या स्मरणिकेचे प्रकाशन व एटीएम कार्डचे वितरण, तसेच अकरा ज्येष्ठ सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोवर बँकेचे माजी चेअरमन यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी या कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे चेअरमन किरण यादव, व्हा. चेअरमन शहाजी खाडे, सर्व संचालक सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कडणे यांनी केले आहे.
56 1 minute read