सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
चित्रकार रवी परांजपे यांच्या चित्रांचे साताऱ्यात रविवारी प्रदर्शन
53 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालयात नव्याने होत असलेल्या भव्य आर्ट गॅलरीमध्ये प्रसिद्ध चित्रकार कै. रवि पंराजपे यांची श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालयास दिलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन रविवार दि 20 सप्टेंबर रोजी भरवण्यात येणार आहे.
या चित्रपटदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी 11 वाजता श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय, सातारचे सहाय्यक अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
तरी सर्व सातारकर कलाक्षेत्रातील कलाप्रेमी, मान्यवर, चित्रकार, कलाशिक्षक, विद्यार्थी, तसेच सर्व सातारकर शिवप्रेमी, पत्रकार यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी केले आहे.
53 Less than a minute