सातारा जिल्हाहोम

अप्रेंटिस योजना उद्योग जगतासाठी फायदेशीर – गिरीश चितळे

सातारा मेगा फूड पार्कमध्ये अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळा संपन्न

कराड/प्रतिनिधी : –
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी अप्रेन्टिस योजना उद्योगजगतासाठी फायदेशीर आहे असे मत  चितळे  डेअरी  उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांनी व्यक्त केले. अप्रेंटिस योजनेमुळे उद्योग जगताला कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वासही गिरीश चितळे यांनी व्यक्त केला.यावेळी उपस्थित असलेल्या केंद्र सरकारच्या फूड इंडस्ट्री कॅपॅसिटी अँड स्किल  इनिशिएटिव्ह (फिक्सी) च्या इंडस्ट्री एंगेजमेंट व प्लेसमेंट विभागाच्या व्यवस्थापिका पुस्पिता राणा यांनी त्यांच्या मनोगतात उद्योग जगताने अप्रेंटिस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यशाळेत औद्योगिक आस्थापनांना  अप्रेन्टिस योजनेच्या अंमलबजावणीमुळे होणारे  लाभ, तसेच या योजनेमुळे  युवक-युवतींना ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होण्याची मिळणारी संधी याबाबत यशस्वी अकॅडमी फोर स्किल्सचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे विशेषतः फूड इंडस्ट्रीचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा मेगा फूड पार्क चे उपाध्यक्ष विजयकुमार चोले यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी व आभार प्रदर्शन योगेश जाधव यांनी मानले.
अप्रेन्टिस योजनेच्या जनजागृतीसाठी फूड  इंडस्ट्री कॅपॅसिटी अँड स्किल इनिशिएटिव्ह (फिक्सी) यांच्या पुढाकाराने आणि यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी योगेश रांगणेकर
मो :7350014536 / 9325509870, ज्ञानेश्वर गोफण (माऊली) मो : 7083474883 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles