आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

सौ. गौरवीताई भोसले यांची ‘विस्मा’च्या संचालिकापदी निवड

कराड/प्रतिनिधी –

जागृती शुगर्सच्या सन्माननीय अध्यक्षा, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पत्नी सौ. गौरवीताई भोसले यांची वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) पुणे, च्या कार्यकारी मंडळावर संचालिका पदी अभिनंदनीय निवड झाली आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील 133 खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर महाराष्ट्रातील नामवंत साखर कारखान्यांचे अध्यक्ष विराजमान आहेत. जागृती शुगर्सच्या माध्यमातून केलेल्या गौरवशाली कामगिरीची दाखल घेत महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) पुणे, च्या कार्यकारी मंडळावर संचालिका पदी जागृती शुगर्सच्या सन्माननीय अध्यक्षा, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पत्नी सौ. गौरवीताई भोसले यांची संचालिका पदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्धल सौ. गौरवीताई भोसले यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘विस्मा’च्या  सर्व कार्यकारी मंडळाचे सन्माननीय संचालक, महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles