सातारा जिल्हाहोम

पाटण तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी साडेचार कोटींचा निधी

कराड/प्रतिनिधी : – 

पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, सदर रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी ना. देसाई यांनी सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजनेंतर्गत सदरचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये प्रजिमा 55 – इजिमा 131 50 लाख, आडदेव -आंब्रुळे रस्ता 50 लाख व त्रिपुडी ते गुरेघर पाचगणी रस्ता 45 लाख अशा तीन इतर जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत म्होप्रे ते रामा 136 रस्ता ग्रामा 80 25 लाख, पश्चिम सुपने – जुनी पाडळी 25 लाख, आरेवाडी डेळेवाडी 30 लाख, प्रजिमा 57 खबालवाडी 40 लाख, देवघर ते तामकणे 25 लाख, प्रजिमा 29 ते रामेल शेळकेवस्ती 20 लाख, खुडुपलेवाडी ते गावडेवाडी 40 लाख, काळगाव ते डाकेवाडी 40 लाख, नाटोशी कदमवाडी 25 लाख व जाईचीवाडी – मराठवाडी 35 लाख या 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी 3 कोटी 5 लाख, त्याचबरोबर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजनेंतर्गत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून रस्त्यांचे कामांसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, मंजूर रस्त्यांच्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

शेतीच्या पाण्यासाठी दीड कोटींचा निधी

पाटण मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांमध्ये शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांतर्गत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये मरड-धनगरावाडा साठवण हौद 15 लाख, दिवशी खुर्द शेतीसाठी वळण बंधारा व आडवे पाट 16.29 लाख, वाटोळे येथे झरा, पाथळ व सातर गौड येथे वळण बंधारा 16.58 लाख, मराठवाडी-दिवशी खुर्द शेतीसाठी आडवे पाट 16.98 लाख, वेखंडवाडी पाट 16.20 लाख, आंबेवाडी घोट साठवण हौद व पाट 16 लाख, ठोमसे येथे जोस्क शिवारात वळण बंधारा 19.52 लाख, शेडगेवाडी विहे येथे साठवण वळण बंधारा 12.29 लाख, म्हारवंड येथे साठवण हौद व शेतीसाठी पाट बांधणे पाइपलाइन 29.29 लाख या कामांचा समावेश आहे.

Related Articles