टिळक हायस्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
शिक्षण मंडळ, कराडच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण दिवसाचे शालेय कामकाज विद्यार्थिनी शिक्षकांनी चांगल्या प्रकारे पार पाडले.
महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य धनाजी देसाई यांनी केले. टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाच्या वतीने सर्व शिक्षकांचा अध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, उपाध्यक्ष प्रबोध पुरोहित, सचिव श्रीकांत कदम यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थिनी प्राचार्या कुमारी चंदना देशमुख, उपप्राचार्या वर्षा पुरोहित, पर्यवेक्षक स्नेहल रायते, स्वरदा किर्लोस्कर, सानिका गरुड, अनुष्का गायकवाड, शर्वरी सोरटे, उम्मेहबीबा मांगलेकर, प्रियांका केंगार, पर्यवेक्षक राजेश धुळूगडे, प्रा. प्रभा ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान विभागातर्फे तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मेघना मल्लापुर यांनी जीवनातील शिक्षकांचे महत्त्व कथन केले.
सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी जाधव हिने केले. कार्याध्यक्षा सुनीता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रभा ठोंबरे, प्रा. सुखदा विदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.