आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हा

कराडात उद्या महा रोजगार मेळावा 

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने आयोजन

कराड / प्रतिनिधी : –

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या स्वयंरोजगार विभागाच्या वतीने कराड येथे गुरुवारी दि. ५ रोजी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूमाऊलीच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली गुरु पुत्र आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महा रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरूवारी दि. ५ रोजी करण्यात आले आहे. या सुवर्ण संधीचा लाभ गरजू मुलामुलींनी घ्यावा तसेच या वेळी सुमारे एक हजार मुला मुलींना नोकरीची सुवर्णसंधी आहे. तरी सर्वात प्रथम सेवेकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याची नोंद सर्व स्वामी समर्थ सेवा केंद्रांनी घ्यावी असे आवाहन दिंडोरी प्रणित वाकाण रोड कराड दरबार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र स्वयंरोजगार विभागाच्या वतीने करण्यात आले.
महा रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचा समावेश आहे . या मेळाव्यात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी, विविध शासकीय योजनांची माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन, महिलांसाठी बचत गटातून रोजगार, कृषी रोजगार याबाबत माहिती दिली जाणार आहे.

1000 हून अधिक रिक्त पदांसाठी महाभरती होणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांचा सहभाग आहे.
बॅक ऑफिस , कॉलिटी ,प्रोडक्शन, सुपरवायझर, अकाउंट , हेल्पर , डिलिव्हरी बॉय ,बँकिंग, अकाउंटंट, डाटा एन्ट्री , टीम लीडर, फील्ड सर्विसेस , रिटेल ,सिक्युरिटी , ई – कॉमर्स ,फॅसिलिटी मॅनेजमेंट ,सेल्स मार्केटिंग , नर्सिंग , हाऊस किपिंग ,कॉल सेंटर ,लॉजिस्टिक्स , आयटीआय सर्व ट्रेडच्या पदासाठी महाभरती होणार आहे.या महाभरती तून नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
गुरुवारी दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायं. ५ वाजेपर्यंत कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह ( टाऊन हॉल) येथे महाभरती होणार आहे. यावेळी गुरू पुत्र आबासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे.
वय मर्यादा किमान १८ ते कमाल ४६ वर्षं असून शैक्षणिक पात्रता १० पास ,नापास , कोणत्याही शाखेतील पदवीधर व उच्च पदवीधर असावा .

अधिक माहितीसाठी मो. न. 8625098333 , 9146146555, 9657329043 , 8551891111 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महा रोजगार मेळाव्याचा जर प्रत्येक केंद्रानी आपल्या गावात प्रचार प्रसार केला तर परम पूज्य गुरुमाऊलीं हितगुज मध्ये आपणास सर्वांना सांगतात की २०% अध्यात्म आणि ८०% समाज सेवा ही गोष्ट सर्व गावांमध्ये सर्व ग्रामस्थांना समजून जाईल. म्हणजे आपल्या ही गावातील सेवा केंद्र समाज सेवा करीत आहे . तरी या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी प्रणित वाकाण रोड कराड श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles