सातारा जिल्हाहोम

दादासाहेब मोकाशी आय. टी. आय. मध्ये प्रवेशाची शेवटची सुवर्णसंधी 

फिटर, ड्रा. सिव्हिल व व्यवस्थापकीय कोटयामधील इलेक्ट्रिशियन विभागातील काही जागा रिक्त 

कराड/प्रतिनिधी : –
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या दादासाहेब मोकाशी ओद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजमाची ता. कराड हे २०१५ पासून कार्यरत आहे. ही संस्था डी. जी. ई. टी., नवी दिल्ली यांच्याशी संलग्न असून डी. व्ही. ई. टी. मुंबई यांच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत संस्थेच्या बहुसंख्य जागा भरलेल्या असून फिटर, ड्रा. सिव्हिल व व्यवस्थापकीय कोटयामधील इलेक्ट्रिशियन या विभागातील काही जागा रिक्त आहेत. त्या जागेवरती प्रवेश घेण्याची शेवटची सुवर्णसंधी ही संस्थास्तरीय समुदेशन फेरीद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
या प्रवेश प्रक्रियेमध्ये समुपदेशन फेरीसाठी पात्र सर्व विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार खुला वर्ग/एस.बी.सी./ओ.बी.सी./एन.टी./ एस.टी. व एस.सी. या सर्व विभागामार्फत फी सवलत दिली जाणार आहे. तसेच १० वी पास विद्यार्थ्यांस १२ वी परीक्षा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यामुळे ITI पास विद्यार्थ्यांस ITI नंतर अकरावी/बारावी करिता वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. तरी या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Related Articles