पाटण विधानसभा मतदारसंघासाठी 2515 योजनेतून 6 कोटींचा निधी

कराड/प्रतिनिधी : –
पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, सभामंडप आदी विकासकामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
यामध्ये अंतर्गत रस्ते सुधारणेसाठी तळोशी, तोरणे बौध्दवस्ती, मणेरी घेरादातेगड, रामेल, खडकवाडी वजरोशी ते जानाई मंदिर, जंगलवाडी तारळे पवारवाडी कुठरे, चिंचेवाडी वजरोशी, डिगेवाडी मुरुड, धुमकवाडी मुरुड, खोणोली, तामकडे, म्हावशी मोळावडेवस्ती ते थोरलावडा, गणेवाडी ठोमसे, कुसरुंड, गुरेघर, खांडेकरवाडी सोनवडे, पापर्डे खुर्द, पाळेकरवाडी बहुले, भिलारवाडी, मारुलहवेली, नवीवाडी जिंती, मोडकवाडी जिंती, सातर म्हाळुंगेवाडी, करपेवाडी काळगाव, मस्करवाडी काळगाव, सुपुगडेवाडी जाधववस्ती व शिंदेवस्ती, तळमावले, शिबेवाडी खालची गुढे या गावांसाठी प्रत्येकी 15 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तर जंगलवाडी जाधववाडी चाफळ, पाठवडे त्रिपुडी किल्ले मोरगिरी गावांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच सभामंडपासाठी दवंडेवस्ती बोपोली 13 लाख, चोपदारवाडी बहुउद्देशीय सभागृह 15 लाख, चोपडेवाडी डावरी सभामंडप 13 लाख, साकुर्डी सभामंडप 15 लाख, त्याचबरोबर केरळ लेाहारवस्ती संरक्षक भिंत 10 लाख, मोरेवाडी कुठरे कदमवाडी येथे अंतर्गत रस्ता व संरक्षक भिंत 15 लाख, आरेवाडी उत्तर तांबवे संरक्षक भिंत 15 लाख, पाडळी केसे पाडळेश्वर मंदिरालगत संरक्षक भिंत 15 लाख या 42 कामांना सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या विकासकामांची निविदा प्रक्रिया करण्याची तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना ना. देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.