डॉ सायरस एस पूनावाला शाळेमध्ये दहीहंडी उत्साहात

कराड / प्रतिनिधी : –
येथील जनकल्याण प्रतिष्ठानच्या डॉ सायरस एस पूनावाला शाळेमध्ये दहीहंडी व गोपाळकाला चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थांनी वेशभूषा परिधान करून उत्साहपूर्ण सहभाग दाखवला. विद्यार्थी श्री कृष्ण आणि राधा यांच्या वेशभूषेत आलेले होते. प्रथमतः जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सी .ए. शिरीष गोडबोले यांच्या हस्ते श्री कृष्णाच्या प्रतिमेचे आणि दहीहंडीचे पूजन करण्यात आल. त्या नंतर श्री कृष्णाच्या जन्माष्टमी संदर्भात व गोपाळ काळा साजरा करण्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रथमेश इनामदार यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच पर्यवेक्षक सौ . अश्विनी होनकळसे यांनी भजन गायन करून विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला.
यानंतर सर्व विद्यार्थांनी गोपाळकाला नृत्य अविष्कार सदर केला. ह्यावर्षी विशेष वैशिष्टय़ म्हणजे गोविंदा म्हणून इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी वेदश्री वेताळ हिच्या हस्ते दहीहंडी फोडून शाळेत सक्षम विद्यार्थिनी घडवण्याचा संदेश सर्वाना दिला गेला. गायन, नृत्य, भजन या सर्व गोष्टी मुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्वक झाले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्साहात नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व पालकांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहून आनंद घेतला. विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.