सातारा जिल्हाहोम

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची शनिवारी वार्षिक सभा

कराड/प्रतिनिधी : –

दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे होणार आहे.

यावेळी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles