सातारा जिल्हाहोम

कृषी पंपांप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांनाही वीजबिल सवलत द्या – आ. बाळासाहेब पाटील 

तळबीडच्या श्रीराम उपसा जलसिंचन संस्थेची  वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –

सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये लहान-लहान शेतकरी एकत्र येऊन दोन-तीन टप्प्यात पाणी उचलल्याने त्यांना एकत्रित ज्यादा हॉर्सपॉवर लागते. परंतु, एकत्रित सभासदानुसार हॉर्सपॉवर 7.50 एचपीच्या खाली आहे. शासनाने 25 जुलै 2024 रोजी 7.50 हॉर्सपॉवर पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय सहकारी पाणीपुरवठा संस्थांनाही लागू करून त्यांनाही वीज बिलात सवलत मिळावी, अशी आपली आग्रही मागणी असल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

तळबीड, ता. कराड येथील श्रीराम उपसा जलसिंचन संस्थेच्या वार्षिक सभेत ते केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिनकरराव मोहिते होते. सभेस सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, माणिकराव पाटील, डी. बी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, नोटीस वाचन संस्थेचे सचिव बादशहा शेख, विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे तपशीलवार वाचन होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले.

चेअरमन मोहिते यांनी संस्थेचा अहवाल सविस्तर मांडला. तसेच 7.50 हॉर्सपॉवर पर्यंतच्या शेतीपंपांना वीज बिलामध्ये दिलेली सवलत सहकारी पाणीपुरवठा संस्थानाही मिळावी, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

आ. पाटील म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून मिळालेल्या ताकदीवर सहकारी पाणीपुरवठा संस्थांची निर्मिती झाली. काही लोक पाणीपट्टी चुकवण्याच्या दृष्टीने ऊस खाजगी कारखान्यात देतात. त्यामुळे संस्था पाणीपट्टी वसुली, तसेच सोसायटीही वसूल न झाल्याने सोसायटीच्या थकीत राहते. पाणीपुरवठा संस्थांची वाढती थकबाकी चिंतनीय असल्याचे सांगितले.
संस्थेचे व्हा. चेअरमन अशोक गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी जयसिंगराव मोहिते, अधिकराव गायकवाड, जयवंतराव मोहिते, अनिलराव मोहिते, वसंत चव्हाण, जयवंत मानकर, अधिक चव्हाण, अनिल मोहिते, राजेंद्र मोहिते, दत्तात्रय मोहिते, अशोक माने, शिवाजी सुतार, अशोक यादव, शशिकांत मोहिते, दत्तात्रय दुर्गावळे, अजित मोहिते, किरण शिवदास, तुकाराम कुंभार, जगन्नाथ मोहिते, धनाजी रकटे, बाळासो जाधव, अनिल गायकवाड, तसेच इरिगेशन विभागाचे अधिकारी, संस्थेचे सभासद उपस्थित होते.

Related Articles