सातारा जिल्हाहोम

धनगरवाडा-मरड लघुपाटबंधारे तलावासाठी साडेबारा कोटी मंजूर 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध 

सणबूर/वार्ताहर : –

पाटण तालुक्यातील धनगरवाडा-मरड येथे लघुपाटबंधारे तलावाच्या कामासाठी 12 कोटी 35 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील धनगरवाडा-मरड गावात विशेषत: उन्हाळयामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत होता .त्यामुळे मरड परिसरातील सर्व गावे व वाडया-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यासाठी ना. देसाई यांच्याकडे लघु पाटबंधारे तलाव मंजूर करण्यासाठी मागणी केली. त्यानुसार ना. देसाई यांनी

लघुसिंचन व जलसंधारण विभागाकरून पाहणीचा प्रस्ताव घेत जलसंधारण, मृद व जलसंधारण विभागाकडे 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे तलाव योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. तसेच जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे शिफारस केली. त्यांनतर सदरचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे आसपासचे 107 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे ना. देसाई यांचे प्रयत्न आहेत. यामुळे धनगरवाडा, मरड परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत.

Related Articles