बदलापूर घटनेचा राष्ट्रवादीतर्फे कराडमध्ये निषेध

कराड/प्रतिनिधी : –
बदलापूर येथील बालिकांवर झालेला अत्याचार व राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्यावतीने आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमो मूक आंदोलनकरण्यात आले. कराड तालुका व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवण्यात आला. तसेच गुन्हेगारांना तातडीने कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली.
याप्रसंगी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, जयंत पाटील, ॲड. विद्याराणी साळुंखे, उमा हिंगमिरे, नंदकुमार बटाणे, सौरभ पाटील, प्रशांत यादव, अख्तर आंबेकरी, प्रताप पाटील, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सुधीर जाधव, प्रमोद पुजारी, सुधाकर जाधव, जयंत जाधव, माणिकराव पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यव्यापी निदर्शन करण्यात आली. पिडीत दोन बालिकांवर झालेला अत्याचार अतिशय घृणास्पद होता. परिणामी, समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर निषेध आंदोलन करण्यात आले.