ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मधुपुष्प हनी’च्या कोरेगाव युनिटला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

 

कराड / प्रतिनिधी :-
मध उत्पादक युनिट मधुपुष्प हनी या नावाने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे कार्यरत असून या युनिटला केंद्र शासन पुरस्कृत खादी ग्रामोद्योग आयोगाकडून नुकतेच युनिट नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रमाणपत्र स्टेट डायरेक्टर योगेश भामरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी मधुपुष्प युनिटचे उद्योजक सतीश शिर्के, प्रतीक कर्पे, खादी कमिशनचे मेंढे व कराडचे दिलीप साळुंखे उपस्थित होते. या युनिटला दिलीप साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
मधुपुष्प हनी हे विविध प्रकारचे मध उत्पादन करत आहे.यामध्ये प्रामुख्याने विविध फुलांचा मध, तुलसी मध, जामुन मध, मध गुलकंद, हनी चॉकलेट, गुलकंद चॉकलेट अशी नाविन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती केली जात आहे. मधुपुष्प मध हे गेल्या ४ वर्षांपासून मधुमक्षिका पालन व मधनिर्मिती यामध्ये काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात मधुपुष्प मधाचे १० आउटलेट असून तसेच वेबसाइटवरुन सुद्धा ग्राहकांना शुद्ध मध पोहचवण्याचे काम करत आहे. या कार्यासाठी स्टेट डायरेक्टर योगेश भामरे यांनी मधुपुष्प मधाचे उद्योजक व खादी आणि ग्रामोद्योग कमिशनचे लाभार्थी सतीश शिर्के व प्रतीक कर्पे याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *